Posts

मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने फेटाळलं आहे. इंद्रा साहनी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने जी 50 टक्के आरक्षण मर्यादा आखली होती ती ओलंडण्यास नकार दिला आहे.

Image
मराठा आरक्षण देत असताना 50 टक्क्यांची मर्यादा भंग करण्यासाठी कोणताही वैध आधार नव्हता, असं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात नोंदवलं आहे. मराठा समाजाला आरक्षणाच्या अंतर्गत आणण्यासाठी मराठा समाजातील नागरिकांना शैक्षणिक किंवा सामाजिकदृष्ट्या मागास घोषित करता येऊ शकणार नाही, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. 96 कुळींसह सर्व मराठा खरंच कुणबी आहेत का? 'बेरोजगार मराठा तरुणांनी नेतृत्व करण्याची हातची संधी घालवली' मराठा समाजातील नागरिकांना सार्वजनिक शिक्षण, नोकरीत महाराष्ट्र सरकारने सामाजिक आणि शैक्षणिक मागास गटातून दिलेलं आरक्षण (SEBC) असंवैधानिक आहे, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. काय आहे प्रकरण? जयश्री पाटील (सदावर्ते) विरूद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, विनोद नारायण पाटील असं हे प्रकरण आहे. मराठा आरक्षण प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती अशोक भूषण, एल. नागेश्वर राव, एस. अब्दुल नझीर, हेमंत गुप्ता आणि रवींद्र भट या पाच सदस्यीय खंडपीठासमोर मराठा आरक्षणाची सुनावणी घेण्यात आली होती. 26 मार्च रोजी राज्यातील मराठा आरक्षण मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात शेवटची सुना...

ऍमेझॉनच्या जंगलातून पुन्हा खतरनाक व्हारसचा शोध; जगावर मोठ्या महामारीचे संकट

Image
अॅमेझॉनच्या जंगलातून जंगलातून निघालेल्या या व्हायरसमुळे संपूर्ण जगावर महामारीचे संकट निर्माण झाले आहे. कोरोनापेक्षाही खतरनाक असलेल्या या व्हायरसवर  संशोधन सुरू आहे. कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण जगाचा गाडा अडकला आहे. त्यापेक्षाही मोठं संकट जगावर घोंगवत आहे. अॅमेझॉनच्या जंगलात सापडलेला हा व्हायरस आतापर्यंतची सर्वात मोठी महामारी आणण्याची क्षमता ठेवतो. ब्राझिलच्या मानौस येथील फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ अॅमेझॉनच्या बायोलॉजिस्ट मार्सेलो गोर्डो आणि त्यांच्या टीमला कूलरच्या आता तीन पाइड माकडांचे कुजलेले मृतदेह आढळून आले. या मृतदेहांना फियोक्रूज अॅमेजोनिया बायोबँक येथे पाठवण्यात आले होते. येथे वैज्ञानिक अलेसांड्राने माकडाच्या सॅम्पल्समधून पॅरासिटिक वॉर्म्स, व्हायरस आणि अन्य संसर्गजन्य घटकांचा शोध लावला आहे. अलेसांड्राने म्हटलं आहे की, मानौस आणि ब्राझिलवर मोठं संकट घोंघावत आहे.  सायन्स जर्नलच्या मते, अलेसांड्रा आणि त्यांच्या टीमने मायारो व्हायरसचा देखील शोध लावला आहे. हा व्हायरस दक्षिण अमेरिकी देशांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरत आहे. या व्हायरसमुळे डॉक्टर हेच कळण्यात अडचण होते की,...

आयपीएल २०२१चा हंगाम तुर्तास केला रद्द, जाणून घ्या उर्वरित सामने केव्हा आणि कुठे होणार?

Image
आयपीएल २०२१चा हंगाम तुर्तास केला रद्द , जाणून घ्या उर्वरित सामने केव्हा आणि कुठे होणार ? क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे . इंडियन प्रीमियर लीगच्या कमिटीने आणि बीसीसीआयने आयपीएल २०२१ स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे . कडक बायो बबल असताना देखील खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती . तसेच आज ( ४ मे ) सनरायझर्स हैदराबादचा वृद्धीमान साहा आणि दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा या खेळाडूंचा कोविड - १९ अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर बीसीसीआयने आणि आयपीएलच्या कमिटीने बैठक घेत आयपीएल स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला . परंतु या स्पर्धेतील पुढील सामने केव्हा होणार ? याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित आहे .   बीसीसीआयने याबाबत कुठलाही खुलासा केला नाहीये की , उर्वरित सामने केव्हा खेळवण्यात येतील ? या स्पर्धेत अजूनही ३१ सामने शिल्लक आहे . बीसीसीआयने खेळाडूंना आपआपल्या घरी जाण्याची परवानगी दिली आहे . त्यामुळे आयपीएल स्पर्धा पुन्हा सुरू होणे थोडे कठीण दिसून येत आहे . जून महिन...