नंबर वन ठरलेलं ह्या अँप चे 5 लाख अकाउंट्स हॅक..विकला जात आहे डेटा विदेशी वेबसाईटवर.....

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. घरबसल्या सोशल मीडियाचा वापर हा मोठ्याप्रमाणात केला जात आहे. अनेक जण नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांच्याशी संवाद साधण्यासाठी कॉन्फरन्स कॉल किंवा व्हिडीओ कॉलचा वापर करत आहे. WhatsApp, TikTok ला मागे टाकत लॉकडाऊनदरम्यान 'झूम' हे अ‍ॅप नंबर वन ठरलं आहे.भारतात 5 कोटींहून अधिक वेळा झूम अ‍ॅप डाऊनलोड करण्यात आले आहे.

सध्या हे अ‍ॅप भारतात प्ले स्टोरच्या फ्री सेक्शनमध्ये नंबर वन अ‍ॅप बनले आहे. झूम अ‍ॅपचे खास वैशिष्ट्ये म्हणजे याचे सोपे युजर इंटरफेस आहे. तसेच या अ‍ॅपमध्ये युजर्सना अनेक फीचर देण्यात आले आहेत.
अ‍ॅपमध्ये वन-टू-वन मीटिंग आणि 40 मिनिटांची ग्रुप मीटिंग कॉलिंगची सुविधा आहे

Zoom App चे 5 लाख अकाउंट्स हॅक, डार्क वेब वर विकला जातो डेटा.


व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी वापरलं जाणारं 'झूम' हे ऍप वापरत असाल तर सावध व्हा, असा इशाराच केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आलाय. झूम हे सुरक्षित प्लॅटफॉर्म नसल्याचं गृह मंत्रालया


गृह मंत्रालयानं 'झूम'बाबत देण्यात आलेल्या सूचना..

>> प्रत्येक मिटिंगसाठी वेगळा युझर आयडी आणि पासवर्डचा वापर करा

>> जॉईन ऑप्शन डिसएबल करावं

>> वेटिंग रुमला एनेबल करावं त्यामुळे इतर युझर्स तेव्हाच यात सहभागी होऊ शकतील जेव्हा कॉन्फरन्स घेणाऱ्याकडून परवानगी मिळेल

>> स्क्रीन शेअरिंगचा पर्याय केवळ होस्टगकडे असेल

>> फाईल ट्रान्सफरच्या पर्यायाचा वापर कमी ठेवा

>> कोणत्याही व्यक्तीला रिजॉईन होण्याचा पर्याय बंद ठेवा

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरु आहे. तसेच, नागरिकांना घरीच राहण्याचे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक जण घरात असल्यामुळे इंटरनेटचा मोठ्याप्रमाणात वापर करत आहेत. याचा फायदा अनेक अ‍ॅप असणाऱ्या कंपन्यांना होत आहे.

या लॉकडाऊनदरम्यान झूम व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅपचा डाऊनलोडिंगमध्ये मोठा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, काही दिवसांनतर झूम अ‍ॅप युजर्सच्या प्रायव्हसीवरून वादात अडकले आहे. गुगल आणि टेस्ला यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना झूम अ‍ॅप वापरण्यास मनाई केली आहे. यातच अशी माहिती येते की, झूम अ‍ॅपचे पाच लाख अकाऊंच झाले असून डेटा डार्क वेबवर विकला जात आहे. 


ब्लीपिंग कम्प्युटरने आपल्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, झूमचे पाच लाख अकाऊंट हॅक करण्यात आहेत आणि डार्क वेबवर कमी किंमतीत युजर्सचा खासगी डेटा विकला जात आहे. यासंबंधी सर्वात आधी एक एप्रिलला सायबर सिक्युरिटी फर्म Cyble ने माहिती दिली होती. रिपोर्टनुसार, डार्क वेबवर झूम अ‍ॅप युजर्सचा डेटा $0.0020 म्हणजे जवळपास 0.15 प्रति अकाऊंट विकले जात आहे. रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, हॅकर्सला आधीच माहिती होती, त्यामुळे नक्कीच पासवर्ड आणि आयडी हॅक केला आहे. 

झूम अ‍ॅप युजर्सचा जो डेटा हॅकर्सपर्यंत पोहोचला आहे, त्यामध्ये ई-मेल आयडी, पासवर्ड, मिटिंगचा युआरएल आणि होस्ट यांसदर्भातील माहिती आहे. तसेच, यामध्ये २९० अकाऊंट हे कॉलेज आणि युनिव्हर्सिटी यांच्याशी जोडले आहेत. ज्या युजर्स डेटा लीक झाला आहे. त्यामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ वर्मोंट, डार्टमाऊथ,  लाफयेते, फ्लोरिडा युनिव्हर्सिटी, कोलोराडो युनिव्हर्सिटी आणि सिटी बँक यांसारख्या कंपन्यांच्या नावाचा समावेश आहे.

केन्द्र सरकारने याची दखल घेत ह्या Zoom App cha पर्याय उपलब्ध करण्याचा विचार करत आहे व tech companies  ला invitation दिले आहे पर्यायी अँप काढण्यासाठी  आणि 1 कोटीची ऑफर दिले आहे जिंकणाऱ्या कंपनी ला.


हा लेख कसा वाटला, कंमेन्ट करून सांगा

आपला वायरल कट्टा





Comments

Popular posts from this blog

आयपीएल २०२१चा हंगाम तुर्तास केला रद्द, जाणून घ्या उर्वरित सामने केव्हा आणि कुठे होणार?

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या व्यक्तींच्या परवानग्यांसाठी नियंत्रण कक्ष स्थापन - जिल्हाधिकारी

ऍमेझॉनच्या जंगलातून पुन्हा खतरनाक व्हारसचा शोध; जगावर मोठ्या महामारीचे संकट