तुम्ही व्हॉटस अॅप वापरत आहात? मग ही बातमी तुमच्यासाठी.........

व्हॉट्स अॅप वापराबाबत महाराष्ट्र सायबर पोलिसांनी नियमावली तयार केली असून सूचनांचे पालन केल्यास काय कायदेशीर कारवाई केली जाईल, याची माहिती यामध्ये देण्यात आली आहे.


करोना व्हायरस संदर्भात अनेक अफवा पसरविणारे मेसेज पुढे पाठविले जाऊ लागेल आहेत. त्यामुळे असे मेसेज पाठविणाऱ्यांच्या विरोधात सायबर पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली आहे.
त्यामुळे लॉकडाउनच्या काळात घरी बसल्याबसल्या सोशल मीडियाचा आधार असला, तरी त्याचा वापर करताना खबरदारी हवीच.

ग्रुपवर कोणी अफवा पसरविणारी, दोन धर्म, जातींमध्ये तेढ निर्माण करणारी माहिती टाकत असेल; तर त्याची माहिती तत्काळ जवळच्या पोलिस ठाण्याला अथवा महाराष्ट्र सायबर सेलकडे करा.

अॅडमिनने ही काळजी घ्यावी...

- ग्रुप तयार करताना त्यामध्ये घेतले जाणारे सदस्य जबाबदार आणि विश्वासार्ह आहेत का, हे खात्री करूनच ग्रुपमध्ये घ्यावे.

- व्ह़ॉटस अॅप ग्रुपच्या अॅडमिनने सदस्यांना ग्रुपवर पोस्ट करण्याच्या नियमांसंबंधी माहिती द्यावी.

- व्हॉट्स अॅप ग्रुपमधील सदस्य अनियंत्रितपणे वागत असतील; तर पोस्ट टाकण्याचा अधिकार फक्त अॅडमिननेच घ्यावा.

- ग्रुपमधील सदस्यांना सांगूनदेखील ते आक्षेपार्ह पोस्ट टाकत असतील; तर त्यांच्याबाबत जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार करावी.

ही कारवाई होऊ शकते...

व्हॉट्स अॅपवर अफवा पसरविणाऱ्या पोस्ट, व्हिडिओ टाकल्यास ग्रुप अॅडमिन व सदस्यांवर विविध कलमांनुसार कारवाई होऊ शकते.

भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम १५३ ए

एखाद्या व्यक्तीने दोन गट, धर्म यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामध्ये तीन वर्षे शिक्षेची तरतूद आहे.

आयपीसी २९५ ए

धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने एखादी पोस्ट, व्हिडिओ, फोटो टाकणाऱ्याच्या विरोधात या कलमानुसार कारवाई केली जाते. यामध्येदेखील तीन वर्षे शिक्षा व दंड अशा शिक्षेची तरतूद आहे.

आयपीसी ५०५

जनतेला त्रास देण्यासाठी हेतूने खोट्या व खोड काढणाऱ्या बातम्या पसरविल्यास या कलमानुसार कारवाई केली जाते. यामध्ये तीन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.

आयपीसी १८८


सार्वजनिकरीत्या काढलेल्या कोणत्याही आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर या कलमानुसार कारवाई केली जाते. यामध्ये सहा महिने शिक्षा व एक हजार रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.

Comments

Popular posts from this blog

आयपीएल २०२१चा हंगाम तुर्तास केला रद्द, जाणून घ्या उर्वरित सामने केव्हा आणि कुठे होणार?

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या व्यक्तींच्या परवानग्यांसाठी नियंत्रण कक्ष स्थापन - जिल्हाधिकारी

ऍमेझॉनच्या जंगलातून पुन्हा खतरनाक व्हारसचा शोध; जगावर मोठ्या महामारीचे संकट