Posts

Showing posts from June, 2020

या बांगलादेशी क्रिकेटपटूच्या पत्नीच्या सुंदरतेची आहे एकच चर्चा; ऐश्वर्या-करिना तिच्यापुढे फिक्या

Image
बांगलादेशी क्रिकेटपटू म्हटलं की आपल्याला फारच मोजकी नावं आठवतात, त्यामध्ये प्रत्येकाला आठवेल असं नाव म्हणजे शकीब अल हसन… शकीब बांगलादेशचा सर्वात चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे. बांगलादेशच्या मोजक्या दिग्गज खेळाडूंपैकी एक म्हणून तो ओळखला जातो. याच शकीबच्या पत्नीच्या सुंदरतेच्या रंजक चर्चा आहेत, कारण ती दिसायला तेवढीच सुंदर आहे… उम्मी अहमद शिशीर असं शकीबच्या पत्नीचं नाव आहे. बांगलादेशी असलेली शिशीर अमेरिकेची रहिवासी आहे. ती १० वर्षांची असताना तिचे आई-वडील तिला घेऊन अमेरिकेला शिफ्ट झाले होते. त्यानंतर ती तिथंच लहानाची मोठी झाली. तिचं शिक्षणही अमेरिकेतच पार पडलं. ती व्यवसायानं इंजिनीयर आहे, तसेच मॉडेलिंग देखील करते. कशी झाली शकीबसोबत ओळख?- क्रिकेटपटूंना अशाच सुंदर पत्नी मिळत नाही, त्यामागे देखील काही रंजक गोष्टी घडलेल्या असतात. शकीबच्या बाबत देखील अशीच रंजक गोष्ट घडलेली आहे. एकदा सुट्ट्यांसाठी उम्मी इंग्लंडला गेली होती. त्याचवेळी शकीबसुद्धा काउंटी क्रिकेट खेळण्याासाठी तिथं आला होता. क्रिकेटपटूंना अशाच सुंदर पत्नी मिळत नाही, त्यामागे देखील काही रंजक गोष्टी घड...

संगीतकार वाजिद खान काळाच्या पडद्याआड…

Image
मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध संगीतकार जोडी साजिद-वाजिदमधील वाजिद खान यांचं रविवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झालं. मुंबईच्या चेंबूरमधील सुरराणा सेठीया रुग्णालयातवाजिद यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ४३ वर्षाचे होते. किडनी आणि घशामध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे मागील अडीच-तीन महिन्यांपासून रुग्णालयातच होते. सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या तीन दिवसांपासून वाजिद व्हेंटिलेटरवर होते आणि त्यांची प्रकृती अत्यवस्थ होती. किडनी आणि घशाच्या इन्फेक्शनमुळे रुग्णालयात दाखल असलेल्या वाजिद यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचंही चर्चा होती. परंतु हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. वाजिद खान यांना मागील वर्षी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टीही करण्यात आली होती. वाजिद खान यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्ती किंवा रुग्णालयाने त्यांच्या मृत्यू संदर्भात कोणतंही अधिकृत पत्रक जारी केलेलं नाही. त्यामुळे वाजिद खान यांच्या मृत्यूसंदर्भात कोविड-19, किडनीच्या इन्फेक्शनपासून हृदयविकाराचा झटका अशी वेगवेगळ्या कारणांची अटकळ बांधली जात आ...

माधुरीच्या बहिणीला कधी पाहिलं आहे का? मग ‘हा फोटो नक्कीच पाहा|

Image
माधुरी सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याच वेळा ती फोटो, व्हिडीओजच्या माध्यमातून तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. यात तिच्या कुटुंबीयांचे फोटो, तिच्या डान्सचे व्हिडीओ यांचाही समावेश असतो. त्यामुळे तिच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी चाहत्यांना माहित आहे. मात्र माधुरीच्या बहिणीविषयी फार कमी जणांना माहित आहे. त्यातच तिने बहिणीसोबतचा एक फोटो शेअर केल्यामुळे तिच्या बहिणीबद्दल जाणून घेण्यास चाहते उत्सुक असल्याचं दिसून येतं. माधुरीने एक थ्रोबॅक फोटो शेअर केला असून यात ती आणि तिची बहिणी डान्स करताना दिसत आहेत. हा फोटो माधुरीच्या लहानपणीचा आहे. विशेष म्हणजे माधुरीची बहिणी हुबेहूब तिच्यासारखी दिसत असून त्यांची हेअर स्टाइलदेखील सारखीच असल्याचं पाहायला मिळत आहे. माझ्या बहिणीसोबत अनेक आठवणी आहेत. मात्र ही सगळ्यात आवडती आठवण आहे. आम्ही शाळेतील प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायचो. माझ्या सगळ्यात आवडत्या सोबतीसह मी हा फोटो शेअर करत आहे. तुमच्या लहानपणातील तुम्हाला लक्षात राहिलेली, आवडती आठवण कोणती? सांगू शकता का?, असं कॅप्शन माधुरीने या फोटोला दिल...

BREAKING: आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदार पणामुळे गेल्या एका आठवड्यात जोगेश्वरी येथील हॉस्पिटलमध्ये 12 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

Image
मुंबई, 31 मे: मुंबईसह उपनगरात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. जोगेश्वरी येथील हॉस्पिटलमध्ये शनिवार अवघ्या 2 तासांत 7 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील बहुतांश हॉस्पिटलमध्ये हाहाकार उडाला आहे. सर्व रुग्णांचा मृत्यू आयसीयूमध्ये ऑक्सिजन लेव्हल (Low Oxygen) कमी झाल्यामुळे झाला, अशी धक्कादायक माहिती एका नर्सनं दिली आहे. नर्सनं नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर दिलेली माहिती अशी की, आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदार पणामुळे गेल्या एका आठवड्यात जोगेश्वरी येथील हॉस्पिटलमध्ये 12 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. येथे वरिष्ठ डॉक्टरांची कमतरता असल्यानं रुग्णांवर योग्य उपचार घेतले जात नाहीत. ' अशी स्थिती याआधी पाहिली नाही' 'मुंबई मिरर'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ही घटना शनिवारची आहे. नर्सने सांगितलं की, अशी स्थिती याआधी कधीच पाहिली नाही. अवघ्या दीड-दोन तासांत डोळ्यादेखत 7 रुग्णांचा मृत्यू झाला. इंडिकेटरमध्ये दिसत होतं की, ऑक्सिजन लेव्हल कमी झाली आहे. रुग्णांना श्वास घेण्यास मोठी समस्या होत होती. आम्ही काही करण्याच...